Marriage Fraud: ‘लुटेरी दुल्हन’ पळाली : राजस्थानहून आलेल्या नवरदेवासोबत ‘मॅरेज ट्रॅप’; आधी हळद लावली, नंतर ‘चुना’!
Rajasthan Groom Tricked with Fake Bride Promise: राजस्थानातून मुलगी पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला छत्रपती संभाजीनगरात फिल्मी स्टाइलने फसवून खोटे लग्न लावून १.३० लाखांची लूट.मनमाड स्टेशनवर नवरी आणि तिची मैत्रीण गायब; ‘हळद लावून चुना’ लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड.
छत्रपती संभाजीनगर : राजस्थानातून मुलगी पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला छत्रपती संभाजीनगरात टोळीने फिल्मी स्टाइलने फसवले. विधिपूर्वक घरातच लग्न लावून दिले. त्यासाठी १ लाख ३० हजार रुपये घेतले.