crime
Sakal
छत्रपती संभाजीनगर - मुलगा नपुंसक असल्याचे माहिती असतानाही त्याचा विवाह लावून दिला. यासह नाशिकला फ्लॅट घेण्यासाठी १५ लाखांची मागणी करीत विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार मे २०२५ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान अंदरसूल (नाशिक) येथे घडला. याप्रकरणी पती, सासू, जाऊ, दीर, नणंद अशा १० जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.