esakal | हे तू काळी आहे, असे हिणवत असल्याने विवाहितेने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

हे तू काळी आहे, असे हिणवत असल्याने विवाहितेने घेतला गळफास

sakal_logo
By
संतोष गंगवाल

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : देवळी (ता कन्नड) (Kannad) येथील विवाहितेने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली. विवाहितेचा वडीलांच्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळीविरोधात देवगांव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पती व सासरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत मुलीचे वडील उत्तम काशीनाथ मालोदे राहणार लामणगांव (ता.खुलताबाद) (Khultabad) यांनी फिर्याद दिली कि माझी मुलगी (Aurangabad) अर्चना हिचा विवाह देवळी येथील सतिष बाबुराव ठोंबरेसोबत साडेतीनवर्षा पुर्वी झाला होता. अर्चनाला तिचा पती, सासु, सासरा, हे तु काळी आहे असे हिणवत नेहमी संशय घेत असे. तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असे. याच कारणांमुळे तिने आत्महत्या केली असून तिच्या मरणास पती,सासु,सासरे हेच कारणीभूत आहे.

हेही वाचा: मित्रांची एकाच वेळी एक्झिट, पुलावरुन दुचाकी कोसळून दोघे ठार

वडीलांच्या फिर्यादीवरून देवगाव रंगारी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पती सतिष कारभारी ठोंबरे,सासरे बाबुराव शंकर ठोंबरे,सासु कांताबाई बाबुराव ठोंबरे (सर्व रा. देवळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक तात्या रुपाजी भालेराव करित आहेत. अर्चना हिच्यावर देवळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image
go to top