esakal | पाचशे रुपये दंडा सोबत मास्क ही देणार 
sakal

बोलून बातमी शोधा

पाचशे रुपये दंडा सोबत मास्क ही देणार 

ग्रामीण भागात प्रत्येकाला मास्क अनिवार्य केला जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारुन त्यांना त्याच वेळी दंडातून मास्क सुद्धा उपलब्ध केला जाईल. तसेच बाजारांच्या, मोठ्या गावांमध्ये अँन्टीजेन टेस्ट वाढविल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी रविवार (ता.२३) रोजी पत्रकार परिषदेत दिली.

पाचशे रुपये दंडा सोबत मास्क ही देणार 

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबादः शहरासोबत ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने ग्रामीण भागात प्रत्येकाला मास्क अनिवार्य केला जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारुन त्यांना त्याच वेळी दंडातून मास्क सुद्धा उपलब्ध केला जाईल. तसेच बाजारांच्या, मोठ्या गावांमध्ये अँन्टीजेन टेस्ट वाढविल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी रविवार (ता.२३) रोजी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले की, एमबीबीएस डॉक्टरांनी बैठकीची सूचना केली होती त्यानुसार आज बैठक घेण्यात आली. यामध्ये ३३ डॉक्टरांना बोलविण्यात आले. सध्या जिल्ह्यात दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्याने शहरासोबत ग्रामीण भागात सुद्धा टेस्ट वाढविल्या जाणार आहे. शहरात मास्क अगोदरच अनिवार्य आहे आता ग्रामीण भागात सुद्धा मास्क अनिवार्य राहणार आहे.

हेही वाचा- मालमत्ताधारकांकडे थकले 385 कोटी

जो विनामास्क फिरेल त्यांना ५०० रुपये दंड केला जाईल. तसेच दंड आकारतांना त्याला मास्क सुद्धा दिला जाणार आहे. ग्रामीण भागात सध्या रुग्ण वाढत असल्याने आणखी ५० हजार किटची ऑर्डर दिली आहे. जी बाजाराची, मोठी गावे आहे तेथे मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्टींग केल्या जाणार आहे. हे सर्व करत असतांना आरोग्याची सुविधा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे ज्या हॉस्पीटलकडे बेड, ऑक्सीजनची सुविधा आहे. अशा हॉस्पीटल मध्ये सुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यावर विचार केला जात आहे. त्यावर चर्चा केली. सध्या ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंटला प्राध्यान्य दिले जात आहे.

काही दिवसांपुर्वी एमजीएम मध्ये डॉक्टरांवर हल्ला झाला होता. डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही. मागील १५२ दिवसांपासून डॉक्टर सेवा देत आहे. तसेच खासगी हॉस्पीटलची बिले तपासण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे. बिले कशी तपासायची याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

प्रत्येक तालुक्याला भेटी देणार 

दररोज किमान दोन तालुक्यांना भेटी देऊन प्रत्येक ठिकाणाची कोरोना स्थितीची आढावा घेतला जाणार आहे. तेथे डॉक्टर, रुग्ण यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्थितीचा आवाका माहित होईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारपासून कोरोना योद्धांसाठी प्रतिसाद कक्ष सुरु केला जात आहे. 
 

loading image
go to top