
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री रोजगार हमी योजना व प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत मोठ्या रकमेचे कर्ज मंजुरीचे आमिष दाखवत शहरातील एका महिलेची तब्बल १२ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. आरोपींनी अन्य फिर्यादींसह १४ जणांना ३४ लाख पाच हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २२ एप्रिल २०२४ ते १६ जुलै २०२५ दरम्यान घडला.