
Jalna News
Sakal
जालना : धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी ‘राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना’ २०१९ पासून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी कोट्यवधींचे अनुदान लाटले, पण विद्यार्थ्यांना मात्र सुविधांपासून वंचित ठेवले. अखेर शासन निर्णयातील निकषांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील २० शाळांची मान्यता इतर मागास बहुजन कल्याण विभागाने रद्द केली आहे.