
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत प्रथमच शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथे झालेल्या या लोकअदालतीत नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील ५४२ सेवाविषयक प्रकरणांपैकी १३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.