मत्स्योदरी विद्यालयात सत्र परीक्षांना प्रारंभ
अंबड, ता. २२ (बातमीदार) : मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या वतीने दिवाळीपूर्वीच प्रथम सत्रातील लेखी व तोंडी परीक्षांना बुधवारपासून (ता. २१) प्रारंभ झाला आहे. तालुक्यातील ताडहादगाव येथील मत्स्योदरी विद्यालयात मुख्याध्यापक विष्णू वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रकाश देशमुख, जगदीश टकले, बळिराम शिंदे, सूर्यकांत मुळे, सतीश नाझरकर, सुरेश केदारे, राजेंद्र उगले, विद्याधर आरगडे, संदीपान कोळकर, विजय मानधनी आणि आम्रपाली हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांना धर्मराज बारहाते, उद्धव घाणे आणि दत्ता शिंगाडे सहकार्य करीत आहेत, असे सहायक प्रशासकीय अधिकारी राहुल भालेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बैठक व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परीक्षा नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याध्यापक विष्णू वाघमारे यांनी दिली.