
Medical Admission Update
Sakal
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नव्याने स्थापन झालेल्या तसेच जागा वाढविलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयांचा आसन वाटप आराखडा (सीट मॅट्रिक्स) जाहीर केला. अंडर ग्रॅज्युएट (यूजी) काउन्सिलिंग २०२५ मध्ये सहभागी दुसऱ्या फेरीच्या यूजी काउन्सिलिंगमध्ये या जागांचा समावेश होणार आहे.