Students: ‘घाटी’तील विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा संकल्प; महिला सुरक्षेचीही घेतली शपथ, ‘सकाळ’ ‘तनिष्का’ अन् पोलिस दल’ यांचा उपक्रम
Ghati Students: छत्रपती संभाजीनगर येथील ‘घाटी’ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केला आणि महिला सुरक्षेसाठी शपथ घेतली. ‘सकाळ’, ‘तनिष्का’ आणि पोलिस दल यांच्या संयुक्त उपक्रमातून जागरूकता मोहीम राबविण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : ‘व्यसन करणार नाही, करूही देणार नाही, मादक पदार्थांपासून दूर राहीन’ असा निर्धार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घेतला आणि समाजप्रबोधनासाठी आपला वाटा उचलण्याचा संकल्प केला.