शेतमजुरांनाही मदत द्यावी

शेतमजुरांनाही मदत द्यावी
Published on: 
मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी धाराशिव, ता. १६ (बातमीदार) : पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीत कामे नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांना प्रतिघरटी १० हजार रुपयांची दुष्काळी मदत द्यावी, तसेच मनरेगाअंतर्गत कामे सुरू करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक संजय पाटील दुधगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात दुधगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असून, त्याचा मोठा फटका शेतकरी आणि शेतमजुरांना बसला आहे. शेतीत कामे उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्त शेतमजुरांना तातडीने प्रतिघरटी १० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी. मनरेगाअंतर्गत तलावांतील गाळ काढणे, नदी व नाल्यांचे खोलीकरण, तसेच बांधबंदिस्तीची कामे सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा दिवाळीपूर्वीच हजारो शेतमजूर रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होण्याची शक्यता असल्याचे दुधगावकर यांनी म्हटले आहे. मागण्यांवर तातडीने उपाययोजना न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com