
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सूतगिरणी चौकात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. गुरुवारी (ता. तीन) मध्यरात्री भर रस्त्यात हा प्रकार होत असल्याने तणाव निर्माण झाला होता. प्रकरणात दोन्ही गटांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे.