Milk Rate: दूध दरवाढीसाठी काॅंग्रेसचे आंदोलन, संभाजीनगर - जळगाव राष्ट्रीय महामार्ग अडविला

Jalgaon Sambhaji Highway: महामार्गावर दूध सांडत सरकार विरोधी दिलेल्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता.
Milk Rate: दूध दरवाढीसाठी काॅंग्रेसचे आंदोलन, संभाजीनगर - जळगाव राष्ट्रीय महामार्ग अडविला

Falambri Latest Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने युवकचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन मंगळवारी (ता.नऊ) सकाळी अकरा वाजता करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेक केला. महामार्गावर दूध सांडत सरकार विरोधी दिलेल्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता.

फुलंब्री शहरांतून छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने महामार्गावर कायम वाहनाची वर्दळ असते. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांचा मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे शहरातील महामार्गावर महात्मा फुले चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महामार्गावर दूध सांडून सरकारचा निषेध व्यक्त केला.

\या आंदोलन दरम्यान युवक काँग्रेसचे ज्ञानेश्वर जाधव हे महामार्गावर चक्क मांडी घालून बसले. त्याचवेळी युवकचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीपराव बोरसे यांनी कार्यकर्त्याच्या अंगावर दूध सांडून त्याचा दुग्धअभिषेक केला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आला. शेतकरी टिकला तर तुम्ही आम्ही सर्व जण टिकणार आहोत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला योग्य भाव द्यावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट अनुदानही द्यावे अशी प्रमुख मागणी या आंदोलन कर्त्यानी गेले.

यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिल्याने परिसर दणावून गेला होता. महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहनाच्या लांबचलाब रांगा लागलेल्या होत्या. यावेळी हे फक्त जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, युवक काँग्रेसचे प्रशांत नागरे, शहराध्यक्ष मुदतसर पटेल, माजी उपसभापती सुभाष गायकवाड, हाफिज मन्सुरी, ज्ञानेश्वर जाधव, गोविंद गायकवाड, देविदास ढंगारे, आकाश गायकवाड, शैलेश बोरसे, सय्यद इफ्तेखार, अजित भोपळे, मोबिन पाशा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

.......

• आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या •

• दुधाला सरसकट 40 रूपये भाव देण्यात यावा

• सरकारने 5 रूपये अनुदान विना अट द्यावे

• अनुदान वाटपात कोणीतीही जाचक अट ठेवण्यात येऊ नये.

• केंद्र सरकारकडून दुध पावडर आयात करण्यात येत आहेत ती लगेच बंद करण्यात यावी.

......

शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव देऊन अनुदानात कोणतीही जाचक अट ठेवू नये. या मागण्यासाठी आज दूध सांडून सरकार विरोधात रस्ता आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्या वेळेत मान्य न झाल्यास आगामी काळात मोठे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल.

- विश्वास औताडे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस

....

शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नसल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव देऊन बिना अट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

- संदीपराव बोरसे, तालुकाध्यक्ष काँग्रेस फुलंब्री

....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com