esakal | मंत्री भुमरे, सत्तार पोलिस सुरक्षा, वाहने सोडणार
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

पोलिस सुरक्षा यंत्रणा व वाहन कोरोनाच्या बंदोबस्तासाठी वापरण्यात यावी, असे पत्र मंत्री संदीपान भुमरे यांनी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना, तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. त्यामुळे लवकरच ते सुरक्षा व वाहने सोडतील.

मंत्री भुमरे, सत्तार पोलिस सुरक्षा, वाहने सोडणार

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशावेळी पोलिस यंत्रणांवर प्रचंड ताण असतो. त्यामुळे राज्याचा रोजगार हमी योजना मंत्री म्हणून मला पुरविण्यात येणारी पोलिस सुरक्षा यंत्रणा व वाहन कोरोनाच्या बंदोबस्तासाठी वापरण्यात यावी, असे पत्र मंत्री संदीपान भुमरे यांनी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना, तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. त्यामुळे लवकरच ते सुरक्षा व वाहने सोडतील. 

हेही वाचा : गुढीऐवजी उभारा भगवी पताका

श्री. भुमरे यांनी नुकतीच जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला होता. कोरोनाचा धोका आणि पोलिस प्रशासन यंत्रणेवरील ताण पाहता मंत्री म्हणून मला पुरविण्यात येणारी पोलिस सुरक्षा यंत्रणा आणि वाहन बंदोबस्ताच्या कामासाठी वापरावे, असे पत्र त्यांनी पाठविले. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले पोलिस संरक्षण आणि वाहन काढून घेऊन ते संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी वापरावे, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना पाठविले आहे. सध्या पोलिस यंत्रणांवर देखील अतिरिक्त ताण आहे. जनतेचे आरोग्य आणि संचारबंदीची योग्य अंमलबजावणी सर्वांत महत्त्वाची असल्यामुळे राजशिष्टाचार म्हणून राज्यमंत्र्यांना पुरविण्यात येणारी सुरक्षा यंत्रणा, पोलिस कर्मचारी व वाहन संचारबंदीच्या कामात उपयोगी पडावे, या हेतूने महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली पोलिस सुरक्षा व वाहन काढून घ्यावे, असे सूचित केले आहे.

loading image