
छत्रपती संभाजीनगर - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा पोक्सोचे विशेष न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी ठोठावली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडिताला शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत करावी असेही आदेशात नमुद केले आहे.