सिडको : एकाने आपल्या वर्गमैत्रिणीसोबत काढलेले फोटो, घरच्यांसह इतर मैत्रिणींना दाखवण्याची धमकी दिली. तुझ्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीकडून तब्बल साडेतीन लाखांचे दागिने आणि १ लाख ६७ हजार उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिडको एन-७ परिसरात २५ मार्च ते ५ जून दरम्यान हा प्रकार घडला.