बेपत्ता शाळकरी मुलाचा मृतदेह आढळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : बेपत्ता शाळकरी मुलाचा मृतदेह आढळला

औरंगाबाद : बेपत्ता शाळकरी मुलाचा मृतदेह आढळला

वाळूजमहानगर : गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह वाळूज औद्योगिक परिसरातील भुजंग वस्तीजवळील एका विहिरीत मंगळवारी (ता.२९) रोजी दुपारी आढळून आला.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील भुजंग वस्ती, कमळापूर येथील समाधान बाबासाहेब मालोदे (११) हा पाचवी वर्गात शिकणारा शाळकरी मुलगा राहत्या समोर खेळता-खेळता शनिवारी (ता.२६) दुपारी बेपत्ता झाला होता. त्याचे वडील माळेगाव ता.भोकरदन येथे नातेवाईकाकडे तर आई बियाणे कंपनीत कामाला गेली होती.

सायंकाळी वडील घरी आल्यानंतर मुलगा समाधान घरी नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो न मिळाल्याने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान त्याचा शोध घेत असताना मंगळवारी (ता.२९) रोजी दुपारी समाधानचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. पोलिसांनी तो काढून घाटीत दाखल केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस अंमलदार दशरथ खोसरे करीत आहेत.

Web Title: Missing School Boy Dead Body Found Waluj Industrial Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..