Chh. Sambhajinagar Protest : शहर बंदला संमिश्र प्रतिसाद; आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून केले बंदचे आवाहन
Parbhani violence : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागांत उत्स्फूर्त बंद तर काही ठिकाणी व्यवहार सुरूच होते.
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील अनेक भागांत उत्स्फूर्त बंद होता, तर अनेक भागांत मात्र व्यवहार सुरळीत सुरू होते.