
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांमध्ये ४ कोटी ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत केला. रस्ते, शाळांच्या इमारती, वॉल कंपाउंड यांसारख्या कामांमध्ये कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून प्रत्यक्षात काम न करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला.