MLA Vilas Bhumre
sakal
छत्रपती संभाजीनगर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनेकडून सोपवण्यात आली. पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघांच्या पूर्वीच्या जिल्हाप्रमुखांनी बंडखोरी केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीपासून हे पद रिक्त होते.