pravin darekar
pravin darekarpravin darekar

मनसे, भाजप जवळ येत असतील तर राज्याच्या हिताचे - प्रवीण दरेकर

Published on

औरंगाबाद : जनआशीर्वाद यात्रेच्या (Jan Ashirwad Yatra) माध्यमातून राज्यात भाजपची (BJP) लहर दिसून येत आहे. भाजप निवडणुकीसाठी तयार आहे. मनसे (Maharashtra Navnirman Sena) आणि भाजपच्या युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव आणि विचारही नाही. मात्र, मनसेचे पदाधिकारी भाजप जवळ येत असतील तर ते राज्याच्या हिताचे असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शनिवारी (ता.२१) औरंगाबादेत (Aurangabad) माध्यमांशी बोलताना सांगितले.मराठवाड्यात निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपासाठी श्री. दरेकर औरंगाबादेत आले होते. श्री. दरेकर म्हणाले, की मनसे एक जबाबदार पक्ष आहे, आमच्यात जर सलोख्याचे वातावरण होत असेल तर स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली होती. तथापि, सध्या युती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

pravin darekar
बायडेन राष्ट्रपती व्हावेत! ओसामा बिन लादेनला का वाटायचं असं?

मनसेप्रमुख राज ठाकरे जे बोलले ते खरे आहे. राज यांच्या मताशी मी सहमत असून राज्यात राष्ट्रवादीमुळेच जातीवाद वाढला आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली. राष्ट्रवादी, शिवसेनेचे अनेक कार्यक्राम झाले तेव्हा कोरोना वाढला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, राधाकिसन पठाडे, राजगौरव वानखेडे, राम बाबा शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com