छत्रपती संभाजीनगर : आधुनिक मशिनरीच्या व्यवयासात गुंतवणूक केल्यास आकर्षक नफ्याचे आमिष दाखवत तरुणाची पाच लाख २४ हजारांची फसवणूक करण्यात आली. एप्रिल २०२४ ते मे २०२४ या कालावधीत हा प्रकार रमानगर, गल्ली क्रमांक २ येथे घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध उस्मानपुरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.