
छत्रपती संभाजीनगर : एखाद्या देशाचा प्रभाव कमी करण्यासाठी आखली जाणारी धोरणे कधी बदलतील, हे सांगता येत नाही. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेले टेरीफचे धोरण तसेच जागतिक आव्हान लक्षात घेऊन भारतीय पद्धतीने शेती विकास करायला हवा, त्यासाठी भारतीय पद्धतीचे तंत्रज्ञानात्मक बदलही आवश्यक आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.