esakal | वैजापूर तालुक्यात पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ, अनेक जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

पिसाळलेले वानर

गावात महिला, वृद्ध, लहान मुले व पुरुषांमध्ये भीतीचे वतावरण पसरले आहे.

वैजापूर तालुक्यात पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ, अनेक जण जखमी

sakal_logo
By
भानुदास धामणे

वैजापूर (जि.औरंगाबाद) : गारज (ता.वैजापूर) Vaijapur येथे गेल्या पंधरा दिवसांपासून एक पिसाळलेल्या वानराने Monkey धुमाकूळ घातला आहे. घरात घुसून काचेच्या वस्तु फोडण्याचा सपाटा लावल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पिसाळलेले वानर घरात घुसून दुरदर्शन संच, कपाटाच्या काचा, आरशे, फोटो, चारचाकी वाहनांच्या काचा फोडत आहे. या वानरास घरातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यास हकलण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर धाव घेऊन जखमी करित आहे. आपण गावात आहे कि जंगलात Jungle असा प्रश्न काहींना पडला आहे. गेल्या आठवड्यात गणेश सरोवर यांच्या घरात घुसून दुरदर्शन संच फोडला, तर किरण सरोवर यांच्या घरात घुसून काचेच्या वस्तु फोडल्या. तसेच शनिवारी (ता.१९) चार वाजेच्या दरम्यान येथील जय योगेश्वर पतसंस्थेत घुसून काचेचे दोन फोटो फोडुन संगणकावर धाव घेतली असता बाहेरून ग्रामस्थांनी दगड फेकून मारल्याने संगणक वाचला आहे. रविवारी (ता.२०) पुन्हा शिवनाथ कांदे यांनी दगड ऊगारला असता त्यांचा या वानराने सातशे ते आठशे फुट पाठलाग करून Aurangabad जखमी केले. यामुळे गावात महिला, वृद्ध, लहान मुले व पुरुषांमध्ये भीतीचे वतावरण पसरले आहे. Monkey Bites Many Villagers In Aurangabad District Of Vaijapur Tahsil

हेही वाचा: मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू,संवेदनहिन लोकांनी बनवले व्हिडिओ

याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना संपर्क साधला असता ते फोन उचलत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन या पिसाळलेल्या वानरास जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

loading image
go to top