Monsoon Update : अतिवृष्टीची नोंद ५१ मंडळांमध्ये;छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह पाच जिल्ह्यांतील स्थिती

मराठवाड्याच्या काही भागांत मॉन्सूनचे दमदार आगमन झाले. रविवारी (ता. नऊ) झालेल्या पावसाने धरतीला आणि बळिराजाला खूश केले.
Monsoon Update
Monsoon Updatesakal

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या काही भागांत मॉन्सूनचे दमदार आगमन झाले. रविवारी (ता. नऊ) झालेल्या पावसाने धरतीला आणि बळिराजाला खूश केले. दरम्यान, यापूर्वी मॉन्सूनपूर्व जोरदार सरी कोसळल्या. गेल्या दहा दिवसांत ५१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात रविवारच्या पावसामुळे ४५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये छत्रपती संभाजीनगरातील सर्वाधिक ३७ मंडळांचा समावेश आहे.

मराठवाड्याच्या बहुतांश भागांत आता मॉन्सूनचे आगमन झाले आहे. काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या मंडळांमध्ये २४ तासांत ६५ मिलिमीटर व त्याहून अधिक पाऊस झाला आहे. मंडळनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः छत्रपती संभाजीनगर तालुका- उस्मानपुरा (६९.७५ मिलिमीटर), छत्रपती संभाजीनगर (६५.५०), कांचनवाडी (८०.२५), चिकलठाणा (१०३), चितेपिंपळगाव (१५०), करमाड (१३८.२५), लाडसावंगी (८४.२५), हर्सूल (८०.५०), कचनेर (१२६.७५), पंढरपूर (६६.२५), पिसादेवी (७३.७५), शेकटा (९०.५०), वरुड काझी ( ८०.५०). पैठण तालुका- आडूळ (१०४), पिंपळवाडी (९७.७५), लोहगाव (१४१.५०), ढोरकीन (१०४), बिडकीन (१४१.५०), पैठण (७१), आपेगाव (६५.२५), निलजगाव (१४१.५०). गंगापूर तालुका- मांजरी (६५.७५), शेंदूरवादा (८४.७५), तुर्काबाद (७२.२५), वाळूज (७२.२५), जामगाव (१००.२५). वैजापूर तालुका- नागमठाण मंडळ (७९.७५), लाडगाव (६८), घायगाव (७५.२५). कन्नड तालुका- कन्नड (६८), चापानेर (६८), पिशोर (६७.७५), करंजखेड (७७). खुलताबाद तालुका- वेरूळ व बाजारसावंगी प्रत्येकी (६७.२५). फुलंब्री तालुका- पीरबावडा (८१,७५), वडोदबाजार (७५.५०).

धोंडराईत ९४ मिलिमीटर

बीड जिल्ह्यात चार, परभणी व हिंगोली तालुक्यांत प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टी झाली. बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई मंडळात ९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याच तालुक्यातील जातेगाव मंडळात (७४.२५), परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण मंडळात (६७.७५) आणि हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील नांदापूर मंडळात ६९ मिलीमीटर पाऊस झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

जालना : आठ मंडळांत अतिवृष्टी

जालना जिल्ह्यात आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यात भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळात (६७ मिलीमीटर), केदारखेडा (१०५.७५), जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद (६७.२५), अंबड तालुक्यात अंबड (७९.५०), गोंधी (६६), परतूर (१००.७५), तर बदनापूर मंडळाचा (७५ मिलीमीटर) समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com