esakal | आईने मिळविला न्याय, मुलाच्या मारेकऱ्यांवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे

आईने मिळविला न्याय, मुलाच्या मारेकऱ्यांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : आधीच नवऱ्यापासून घटस्फोट झालेला, पदरात दोन मुले. लेकरांच्या भविष्यासाठी घरकाम करत संसाराचा गाडा हाकत असतानाच मोठ्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. मात्र, जुन्या भांडणातून त्याला बुडवून मारल्याचे समजताच तिने थेट न्यायालयात धाव घेत, या प्रकरणी तक्रार दिली. वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने ‘ती’च्या मुलाला बुडवून मारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून सावरत तिने हिमतीने न्याय मिळविला. मात्र, अजूनही तिची लढाई संपलेली नाही. प्रतिभा शिंदे असे त्या महिलेचे नाव असून रोहन शिंदे (११) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा यांचा चार वर्षापूर्वी कायदेशीर घटस्फोट झाल्यापासून दोन्ही मुलांसोबत (रोहन, वय ११ वर्षे) आणि (यशराज वय ९ वर्षे) विटखेडा Aurangabad भागात राहतात. २५ ऑगस्ट २०२० रोजी रोहन मित्रांसोबत वाल्मी Walmi तलावात पोहायला गेल्यानंतर बुडाला. त्याला अग्निशामन विभागाने पाण्यातून बाहेर काढून घाटीत दाखल केले असता, तो मृत झाला होता.mother get justice after her son killing in aurangabad glp88

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

दुसऱ्या दिवशी प्रतिभा यांना मुलास बुडवून मारल्याचे समजले. रोहन हा वाल्मि तलावात पोहण्यास गेला असता, अक्षय परमेश्वर अवचरमल याने जुन्या भांडणातून पुन्हा रोहनशी वाद घातला आणि रोहनला हाताला धरुन तलावात बुडविले, रोहनवर येण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा त्याला पाण्यात ढकलले. तसेच अवधूत जगदाळे, नितीन सपकाळ यांनी रोहनला पाण्यात बुडविले, ही घटना घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणातील संशयित अक्षय अवचरमल, अवधूत जगदाळे, नितीन सपकाळ, रोशन लहाने आणि बेबी (पूर्ण नाव नाही) (सर्व रा. विटखेडा) या पाच जणांविरोधात प्रतिभा यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला असता, प्रतिभा यांना शिवीगाळ करुन धमकीही दिली होती. मात्र, त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वरील पाच संशयितांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कराळे करत आहेत.

loading image