Crime News: आईनं पोटच्या मुलांना झोपेतच संपवलं; निर्दयी महिला पोलिसांच्या ताब्यात mother killed two children accused woman in police custody Aurangabad crime news Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: आईनं पोटच्या मुलांना झोपेतच संपवलं; निर्दयी महिला पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबादमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. आईनेच पोटच्या मुलांचा गळा दाबून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांचा आईने झोपेतच जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मुलांची आई मनोरुग्ण असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. औरंगाबादमधील या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरामध्ये दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ घरी झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोघा बहिण-भावाला मृत घोषीत केलं. अदीबा फहाद बसरावी, असं मृत 8 वर्षीय मुलीचं नाव आहे. तर अली बिन फहाद बसरावी, असं 4 वर्षीय मुलाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री घरातील लोकांसोबत जेवले आणि त्यानंतर झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली, त्यावेळी दोघेही बेशुद्ध आढळले. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी मुलांना मृत घोषीत केलं. मुलांचा मत्यू नेमका झाला कसा? याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान होतं. अखेर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनेच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे.

टॅग्स :crimeaurangabad