esakal | MPSC: 'नुसतीच घोषणा नको, अंमलबजावणी करा'
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc

MPSC: 'नुसतीच घोषणा नको, अंमलबजावणी करा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोना, मराठा आरक्षण तर कधी शासकीय खर्चात कपात अशी विविध कारणे दाखवून शासनानी भरती प्रक्रियाच बंद करून टाकली आहे. या काळात प्रशासन व मंत्र्यांच्यावतीने विविध आश्वासने व घोषणा करण्यात आल्या; परंतु त्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आज आमच्यातील विद्यार्थी मित्राने आत्महत्या केली. शासन आणखी किती काळ विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणार आहे? आता आम्हाला केवळ घोषणा नको तर घोषणांची अंमलबजावणी करा, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संतप्त विद्यार्थ्यांनी केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवूनही नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. सरकारचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा हा त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप करत एमपीएससीच्या भोंगळ कारभाराविरोधात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.५) औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात आंदोलन केले. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून एमपीएससीच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक विद्यार्थ्यांकडे आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: अखेर ‘ते’ फार्महाऊस केले सील, खासदारांवर मात्र कारवाई नाहीच

दरम्यान या आंदोलनात सरकार व एमपीएससीच्या कारभारावर ताशेरे ओढत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वप्निल लोणकर याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख तात्काळ जाहीर करावी, एमपीएससीच्या सर्व नवीन जाहिराती व त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे, विविध परीक्षेत प्रलंबित असलेल्या नियुक्‍त्या देण्यात येऊन प्रलंबित मुलाखती घेण्यात याव्या, सरळ सेवा परीक्षा खासगी आयटी कंपन्यांमार्फत न घेता एमपीएससीमार्फत घेण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आले.

loading image