

Winter 2025 Exams
sakal
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) हिवाळी २०२५ सत्राच्या लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या परीक्षांचा कालावधी ११ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान एकूण १८ दिवसांचा असणार असून, सर्व शाखांच्या सेमिस्टरनिहाय परीक्षा या कालावधीत घेण्यात येणार असून, यात अल्पमुदतीचा अभ्यासक्रम, पॉलिटेक्निकच्या नियमित आणि फार्मसीच्या पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे.