
छत्रपती संभाजीनगर : महावितरण कंपनीकडे वीज ग्राहकांकडून वीजजोडणी घेताना सुरक्षा ठेव ठेवण्यात येते. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर व नांदेड परिमंडलातील लघुदाब वर्गवारीतील ३१ लाख ६८ हजार ८६४ वीज ग्राहकांना अशा ठेवण्यात आलेल्या सुरक्षा ठेवीवर गेल्या आर्थिक वर्षात २०२४- २५ मध्ये २३ कोटी ४९ लाख ६१ हजार रुपये व्याज परतावा मिळाला आहे. हा परतावा वीजबिलातून समायोजित करण्यात आला आहे.