esakal | औरंगाबादेत दिवसभरात म्युकर मायकोसिसने सहा जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

औरंगाबादेत दिवसभरात म्युकर मायकोसिसने सहा जणांचा मृत्यू

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना आत म्युकर मायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. बुधवारी (ता. २६) एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या शहरात ४३९ जणांवर उपचार सुरू आहेत.

म्युकर मायकोसिसच्या आजाराचे बळी दिवसेंदिवस वाढत आहेत. या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी औषधींचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. पण आजारावर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणेला अपयश आले आहे. त्यामुळे या आजारामुळे मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा: World No Tobacco Day 2021: काय आहे या दिवसाचं महत्त्व?

म्युकर मायकोसिसमुळे बुधवारी (ता. २६) शहरात सहा जणांचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात चार तर खासगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. या आजाराने शहरात आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ६२ एवढी झाली आहे तर सध्या ४३९ रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारावर मात करून २०६ जण घरी गेले आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.