esakal | World No Tobacco Day 2021: काय आहे या दिवसाचं महत्त्व? जाणून घ्या यावर्षीची थीम
sakal

बोलून बातमी शोधा

world no tobacco day

World No Tobacco Day 2021: काय आहे या दिवसाचं महत्त्व?

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: जगभरात आज (३१ मे) हा 'नो टोबॅको डे' किंवा 'जागतिक तंबाखू निषेध दिन' (World No Tobacco Day 2021) दिवस म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी यासाठी एक थीमही ठेवली जाते. २०२१ मध्ये या दिनाची थीम 'तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध' (Commit to Quit) आहे.

कोणी सुरुवात केली होती-

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 'नो टोबॅको डे' सुरुवात केली होती. १९८७ साली तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या मृ्त्यूंचे वाढते प्रमाण पाहून यास महामारी घोषित केले होते. नंतर या दिनाची सुरुवात पहिल्यांदा ७ एप्रिल १९८८ ला जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्धापन दिवसाला केली होती. सध्या 31 मे ला दरवर्षी जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून ओळखला गेला.

हेही वाचा: 'पारो'च्या समाधीची पडझड; स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाने झटकले हात

जागतिक तंबाखू निषेध दिनाचा उद्देश-

या दिनाचा उद्देश (World No Tobacco Day Significance) तंबाखूचा किंवा तंबाखुजन्य पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांत जागरुकता निर्माण करणे हा आहे. 'धुम्रपान आरोग्यासाठी धोकादायक आहे' हा फक्त इशारा राहता नये तर त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे.

तंबाखुपासून होणारे आजार-

तंबाखुच्या सेवनाने कर्करोग, हृदयाशी निगडीत रोग, दातांसंबंधी रोग अशा गंभीर आजारांना समोरे जावे लागत असल्याची माहिती तज्ज्ञ सांगतात.