Chh. Sambhajinagar : पाणी उपसा घटला; टंचाई टाळण्यासाठी महापालिकेचा इमर्जन्सी पंप सुरू करण्याचा निर्णय

नाथसागरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिकेच्या रोजच्या पाणी उपशावर परिणाम होत आहे. तब्बल पाच एमएलडीने पाणी उपसा घटला आहे.
municipal corporation decision to start emergency pump to avoid water shortage
municipal corporation decision to start emergency pump to avoid water shortageSakal

छत्रपती संभाजीनगर : नाथसागरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. महापालिकेच्या रोजच्या पाणी उपशावर परिणाम होत आहे. तब्बल पाच एमएलडीने पाणी उपसा घटला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने इमर्जन्सी पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गुरुवारी (ता. २४) पाहणी करणार आहेत. हे पंप सुरू करण्यासाठी सुमारे १५ लाखांचा खर्च महापालिकेला अपेक्षित आहे.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे विविध तांत्रिक अडचणीमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. नवीन ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन सुरू झाल्यानंतर शहरातील पाण्याचा गॅप कमी होईल, असा दावा केला जात होता. पण, सध्यातरी तो फोल ठरला आहे.

नव्या योजनेतून रोज १७ ते २० एमएलडी पाणी मिळत असले तरी जायकवाडी धरणातील पाणी पातळी खोल जात असल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे. त्यामुळे धरणातील इमर्जन्सी पंप सुरू करण्यात तयारी महापालिकेने सुरू केली आहे. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी गुरुवारी इमर्जन्सी पंपगृहाची पाहणी करणार आहेत. मे महिन्यात इमर्जन्सी पंप सुरू केले जातील, असे सांगितले असले तरी त्यासाठी पूर्वतयारी करावी लागणार आहे.

सध्या १२ टक्के पाणीसाठा

पाण्याचे होणारे बाष्पीभवन व दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा १२ टक्क्यांवर आला आहे. सध्या पाणीपातळी ४५७ मीटर एवढी आहे. ४५५ मीटरच्या खाली पाणीपातळी आल्यानंतर महापालिकेचा इमर्जन्सी पंप उघडा पडेल.

त्यानंतर काम सुरू केले जाईल, पंपाच्या संरक्षणासाठी पत्र्याचे शेड उभारणे, ७५ अश्‍वशक्तीचे सहा पंप बसविणे यासह इतर कामे केली जातील, असे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com