Municipal Corporation: झोपडपट्टी गावठाणमध्येही आता गुंठेवारी; महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांचा निर्णय
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत मालमत्ता नियमित करण्याची संधी दिली आहे. गावठाण आणि झोपडपट्टी भागांतील मालमत्तांना गुंठेवारीत समावेश करण्याचा नियमही मंजूर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर पाडापाडी सुरू केली आहे. बेकायदा बांधकामे केलेल्या मालमत्ताधारकांना उर्वरित मालमत्ता नियमित करून घेण्याची संधी देण्यात आली आहे.