gayabai magar
sakal
छत्रपती संभाजीनगर - अंगावर सुरकुत्या, हाताला आधार, पावलात थकवा... पण, डोळ्यांत मात्र आशा होती. वय वर्षे ८५ असलेल्या गयाबाई मगर (रा. शिवपुरी कॉलनी, पडेगाव) यांनी दुपारी दीडच्या सुमारास प्रभाग चारच्या मतदान केंद्र असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला आणि मुलीच्या आधाराने हळूहळू शिवपुरी कॉलनीकडे चालू लागल्या.