
Sant Dnyaneshwar Udyan
sakal
पैठण : येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानात विकासकामांना सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे व रंगीत पाण्याचे फवारे सुरू केले आहेत. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या उद्यानात प्रसन्नतेचे व आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.