

mysterious loud sounds in Kalamb Dharashiv district
sakal
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यासह परिसरातील गावात बुधवारी सकाळी नऊ ते सव्वानऊच्या सुमारास तीन वेळा तर गुरुवारी (ता. पाच) दुपारी सुमारे ३:०९ व ३:११ वाजण्याच्या दरम्यान कांही ठिकाणी दोन तर कांही ठिकाणी तीन वेळा मोठ्या गूढ आवाजआल्याचा नागरिकांनी सांगितले.काही ठिकाणी या आवाजांसोबत भूकंपासारखा सौम्य धक्का जाणवल्याचे, तर घरावरील पत्रे, घरातील भांडी हदरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले,तर काही नागरिकांच्या मते हे आवाज आकाशातून आले असून त्यानंतर काही काळ विमानासारखा घोंघावणारा आवाज ऐकू आला.