Sambhaji Nagar : नाफेडतर्फे बाजारभावाप्रमाणे खरेदी होणार तूर

खुल्या दराने खरेदी करणार असल्याने व्यापाऱ्यामध्येही स्पर्धा निर्माण होत शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.
sambhaji nagar
sambhaji nagarSakal

छत्रपती संभाजीनगर : यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या प्रमाणे बाजार भाव मिळावा, यासाठी नाफेडतर्फे खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यातील बाजार समितीत जाधववाडी आणि गंगापूर येथील दोन केंद्रांवर खुल्या पद्धतीने खरेदी आणि ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. के. पांडव यांनी गुरुवारी (ता.२१) दिली.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : उपचार सोडून वृद्धेची दागिने शोधासाठी पायपीट

दोन्ही केंद्रांवर १३ डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाने कडधान्य हमीभावापेक्षा बाजार भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यासह खुल्या दराने खरेदी करणार असल्याने व्यापाऱ्यामध्येही स्पर्धा निर्माण होत शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.

शासनाने यंदा तुरीला ७ हजार रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला. सध्या बाजारात साडेसात ते आठ हजार रुपयांचा दर मिळत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडे नोंदणी करावी, असे आवाहनही पणन अधिकारी पांडव यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com