Dr. Yashwant Manohar : डॉ. यशवंत मनोहर यांना यंदाचा ‘नागसेन गौरव’ पुरस्कार जाहीर

नागसेन फेस्टिव्हलअंतर्गत मानाचा ‘नागसेन गौरव पुरस्कार’ मिलिंद महाविद्यालयाचे १९६१ च्या काळातील माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर करण्यात आला
Dr. Yashwant Manohar
Dr. Yashwant Manohar sakal

छत्रपती संभाजीनगर : नागसेन फेस्टिव्हलअंतर्गत मानाचा ‘नागसेन गौरव पुरस्कार’ मिलिंद महाविद्यालयाचे १९६१ च्या काळातील माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर करण्यात आला.

डॉ. यशवंत मनोहर हे मिलिंद नागसेनवनाच्या साहित्य चळवळीचे मानबिंदू आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. सुमारे १२५ पेक्षा अधिक ग्रंथ, कविता संग्रह, समीक्षा ग्रंथ, वैचारिक साहित्य साहित्याचे लिखाण केले आहे.

Dr. Yashwant Manohar
Sambhaji Nagar News : संशयित काश्मिरी तरुण, महिला ताब्यात

दलित पँथरच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचा हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. नागपूर विद्यापीठात मराठी विभागप्रमुख व अकॅडमीक स्टाफ कॉलेजचे प्राचार्यपदही भूषविले आहे. लुम्बिनी उद्यान, नागसेनवन येथे ३१ मार्चरोजी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com