Nanded Farmer Death: बंद खोली, बाहेरून कुलूप; सीसीटीव्हीही नाहीत! ;नांदेडला फायनान्स कंपनीमध्ये शेतकरी मृत्यू प्रकरणात संशयाला वाव, तिघे ताब्यात

Illegal Loan Recovery : नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. कर्जवसुलीसाठी अपहरण आणि मारहाण केल्याचा नातेवाइकांचा आरोप असून, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे अंतिम कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.
Police investigate the death of farmer Chandrakant Shinde, whose body was found inside a finance company office in Nanded.

Police investigate the death of farmer Chandrakant Shinde, whose body was found inside a finance company office in Nanded.

esakal

Updated on: 

नांदेड,: शहरातील हिंगोली गेट पुलाजवळील खालसा (केएफ) एंटरप्रायझेस या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे (वय ४०, रा. माळकौठा, ता. मुदखेड, जि. नांदेड) यांचा मृतदेह शनिवारी (ता. २४) पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ‘घटनास्थळाची बंद खोली, बाहेरून लावलेले कुलूप, मृतदेहाखाली असलेला टेबल, वित्तीय संस्थेचे कार्यालय असूनही सीसीटीव्ही नसणे आणि अपहरण करून डांबून ठेवणे’ या कारणांमुळे हा खून आहे, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, वजिराबाद पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

शिंदे यांनी संबंधित संस्थेकडून दहा हजारांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी तीन हजार वळते करून त्यांच्या हाती सात हजार पडले होते. चक्रवाढ पद्धतीने रक्कम ७५ हजार झाल्याचे सांगत त्याची मागणी सुरू होती, असे सांगण्यात आले. दरम्यान, मृत शेतकऱ्याची पत्नी ज्योती चंद्रकांत शिंदे (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माळकौठा गावातील मारुती मंदिराजवळून गुरुवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी चंद्रकांत शिंदे यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नांदेड येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात नेले. त्यानंतर त्यांना दोन दिवस डांबून ठेवून मारहाण केली. दरम्यान, शनिवारी शिंदे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. शिंदे यांना मारहाण करून लटकवण्यात आले, असा आरोप तक्रारीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com