

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण-मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन दरम्यान १६ साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सुविधेमुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून या गाड्यांच्या एकूण १६ फेऱ्या होणार आहेत.