नांदेड- पटना विशेष रेल्वेगाडीची एक फेरी

नांदेड- पटना विशेष रेल्वेगाडीची एक फेरी
Published on: 
मुख्य अंकासाठी नांदेड-पाटणा विशेष रेल्वेची फेरी - उद्यापासून हिंगोली, अकोला, जबलपूरमार्गे प्रवास हिंगोली, ता. १६ : दिवाळी सण संपल्यानंतर सुरू झालेली परतीची गर्दी आणि उत्तर भारतीयांचा सर्वांत मोठा लोकउत्सव असलेल्या ‘छठपूजा’ सणानिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने नांदेड ते पाटणा दरम्यान विशेष एकमार्गी (वन-वे) रेल्वेगाडी चालवण्यात येणार असून, ही गाडी हिंगोलीमार्गे धावणार आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेले नागरिक आता मोठ्या प्रमाणावर कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. तसेच सध्या छठपूजा सुरू असल्याने नियमित गाड्यांमध्ये प्रचंड प्रतीक्षा यादी आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने ही विशेष फेरी जाहीर केली आहे. चौकट गाडीची वेळ व थांबे ही विशेष रेल्वेगाडी बुधवारी (ता. १८) रात्री ९.१५ ला नांदेड रेल्वेस्थानकावरून रवाना होईल. ही गाडी पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर या स्थानकांवर थांबत शुक्रवारी (ता. २०) सकाळी ८.३० ला पाटणा येथे पोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.