esakal | अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्याची पैठणला भेट, साधला संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

कारकीन (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मागासवर्गीय आयोगाच्या उपसंचालक अनुराधा दुसाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील.

अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्याची पैठणला भेट, साधला संवाद

sakal_logo
By
विनोद शहाराव

ढोरकीन (जि.औरंगाबाद) : कारकीन (ता.पैठण) (Paithan) येथे मंगळवारी (ता.२०) सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (National Commission For Scheduled Castes) सदस्य सुभाष पारधी (Subhash Pardhi) यांनी भेट दिली. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा (वस्तीशाळा) येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (IAS Sunil Chavan), ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले (IAS Mangesh Gondawale), उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसील चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते. कारकीनच्या महिला सरपंच भारती नवले यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.पारधी यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी यांनी कारकीन गावातील दलित वस्तीमध्ये काही कामे अपूर्ण असल्यास ती पुर्ण करुन नवीन विकास कामे करु. (national commission for scheduled castes member visit aurangabad news glp 88)

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

त्यानंतर सुभाष पारधी यांनी थेट दलित नागरिकांशी संवाद साधत गावांमध्ये किती जणांना घरकुल मिळाले, किती नागरिकांकडे शौचालय आहेत, किती कुटुंबाना उज्वला योजनेचा लाभ मिळाला. उच्च शिक्षित तरुणांची संख्या किती? गावात दलितांमध्ये फक्त एकच युवक वकील झाला. त्याचे सुभाष पारधी यांनी अभिनंदन केले. यावेळी काही नागरिकांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.

loading image