

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: ढोरकीन जवळील स्कोअर व्हॉल्व्ह फुटल्यामुळे मुख्य जलवाहिनीच्या चाचणीत अडथळा निर्माण झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्र) आणि जीव्हीपीआर कंपनीने तातडीने दुरुस्ती सुरू केली. त्यानंतर दोन दिवस स्कोअर व्हॉल्व्ह बदलण्यात आले. आता नक्षत्रवाडी जवळील निसर्ग नर्सरीजवळ मेनहोल बंद करून स्कोअर व्हॉल्व्ह जोडणीचे काम रविवारी (ता.१२) रात्री उशिरापर्यंत सुरू होते.