Navneet Rana : काँग्रेसमुळे सामान्य जनता विकासापासून वंचित

Lok Sabha Election : नवनीत राणा यांची टीका : पैठण येथे रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ रोड शो
पैठण येथे रोड शो दरम्यान नवनीत राणा यांनी काँग्रेस वर टीका केली.
पैठण येथे रोड शो दरम्यान नवनीत राणा यांनी काँग्रेस वर टीका केली. esakal

Paithan : गेल्या ७५ वर्षांच्या काळात काँग्रेस पक्षाने सामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे, अशी टीका भाजप नेत्या खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी पैठण येथे केली. लोकसभेच्या जालना मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ रोड शोच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

पैठण येथे रोड शो दरम्यान नवनीत राणा यांनी काँग्रेस वर टीका केली.
Chatrapati Sambhaji Nagar: आवाजावरून दोन गटांत वाद? चिकलठाण्यात दोन गटांत दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात, तणावपूर्ण शांतता

यावेळी उमेदवार रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश‌ उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, विधानसभाप्रमुख डॉ. सुनील शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण औटे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे व कल्याण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनीत राणा म्हणाल्या, एमआयएम व काँग्रेस पक्ष जातीपातीचे राजकारण करत असून, पाकिस्तानचे गुणगान गात आहे. त्यामुळे काँग्रेसला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे.

पैठण येथे रोड शो दरम्यान नवनीत राणा यांनी काँग्रेस वर टीका केली.
Navneet Rana: ' तुम्हाला 15 मिनिट पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील...'; नवनीत राणांच्या वक्तव्यावरुन AIMIM आक्रमक

देशातील तीन कोटी महिलांना घरे, शेतकऱ्यांपासून मजूर, कामगार व महिलांना विकास योजनेचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून नवा आयाम दिला आहे. त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तुमचे एक मत द्यावे, असे आवाहन राणा यांनी केले. यावेळी दानवे यांचेही भाषण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com