Navratri Festival 2022 : दाक्षायणी देवीच्या नवरात्र महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival 2022

Navratri Festival 2022 : दाक्षायणी देवीच्या नवरात्र महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ

लासूर स्टेशन : लासूरगाव (ता.वैजापूर) येथील प्रसिद्ध देवस्थान दाक्षायणी देवीच्या नवरात्र महोत्सवास सोमवारपासून (ता.२६) प्रारंभ होत असून पाच ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दाक्षायणी देवीच्या दर्शनाला जिल्ह्यासह राज्यातून लाखो भाविक मोठ्या संख्येने येतात.तर पंचक्रोशीतून पहाटे पायी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. यंदा नदीला पाणी असल्याने भाविकांना पर्वणी ठरणार असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

श्री देवी दाक्षायणी मंदिर नवरात्र महोत्सवादरम्यान दररोज धार्मिक विधी, सकाळी दुपारी व सायंकाळी दाक्षायणी मातेची पूजा, आरती, नैवेद्य, चौघडा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेला सोमवारी (ता.२६) सकाळी साडेनऊला घटस्थापना होणार आहे. त्यानंतर नवरात्र व मातेस वस्त्रालंकार परिधान विधी, मंगळवारी (ता.२७) सकाळी नऊला सप्तशती पाठ तसेच सोमवारी (ता.३) दुपारी एक ते पावणेपाच वाजेदरम्यान होम हवन व पूर्णाहुती, मंगळवारी (ता.४) पहाटे पाच वाजता महा अभिषेक, बुधवारी (ता.५) सायंकाळी पाच वाजता विजयादशमी, पानसुपारी, सिमोलंघन व शमीपूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येईल.

येथील नवरात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष कल्याणचंद मुनोत, उपाध्यक्ष शिवाजीराव भिसे, सचिव आसाराम शेजूळ, विश्वस्त सुभानराव देशमुख, राधेश्याम शर्मा, किशोर कुलकर्णी, जगन्नाथराव हरिचंद्रे, पदसिद्ध विश्वस्त राहुल गायकवाड, व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, सहव्यवस्थापक संतोष शेलार, पुजारी प्रकाश जोशी, कर्मचारी भाविक आणि सर्व ग्रामस्थांनी केले आहे.

कर्णपुरा यात्रेमुळे वाहतुकीत बदल

हे असतील बंद रस्ते

  • लोखंडी पुल ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग

  • कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग

  • महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप चौक) ते पंचवटी चौक उड्डानपुला खाली जाणारा व येणारा मार्ग

  • रेल्वेस्थानकाकडून महावीर चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग.

हे असतील पर्यायी रस्ते

  • रेल्वेस्थानकाकडून मध्यवर्ती बसस्थानकाडे जाण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करावा.

  • नाशिक-धुळेकडून येणारे व जालना बीडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी शरणापुर फाटा, साजापुर फाटा, एस. क्लब-लिंक रोड या मार्गे धुळे सोलापुर महामार्गे जातील.

  • पुणे नगर रकडून येणारे व जालना बीड कडे जाणारी वाहने ए.एस. क्लब--लिंक रोड-महानुभव आश्रम चाैक मार्गे जातील.

  • कोकणवाडी चौकाकडून पंचवटी चौकाकडे जाणारी वाहने रेल्वेस्थानक किंवा क्रांतीचौक मार्गे जातील.