Shashikant Shinde: शेतकरी आत्महत्या नव्हे, सरकारने केलेला खूनच! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सरकारवर घणाघात
Flood Relief: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारवर घणाघात केला आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे झालेल्या या मृत्यूंना त्यांनी ‘सरकारचा खून’ असल्याचा निषेध व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात अतिवृष्टीने उभी पिके तर गेलीच; परंतु जमीनही पूर्णपणे वाहून गेली आहे. बाधित शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सरकार विमानातून दौरे करीत आहेत.