GMC Ghati: रेडिओलॉजी, मेडिसिन, स्किनकडे ‘ओढा’; टॉप १०० मधील चौघांची घाटीला पसंती, ‘पीजी’साठी राज्य कोट्याची पहिली प्रवेश फेरी
First State Quota Allotment 2025: नीट पीजी २०२५ मध्ये टॉप स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेडिओलॉजी, मेडिसिन, स्किनसह घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राधान्य दिले. राज्य कोट्याची पहिली फेरी जाहीर.
छत्रपती संभाजीनगर : एमडी, एमएस प्रवेशासाठी राज्य कोट्याचे जागावाटप सोमवारी (ता. एक) जाहीर झाले. प्रथम फेरीच्या निवड यादीत नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांच्या गर्दीतही ‘घाटी’चा ठसा उमटला आहे.