

NEET (UG) 2026
esakal
छत्रपती संभाजीनगर: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलीजीबीलीटी कम एन्ट्रान्स टेस्ट (यूजी) २०२६ परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जातील माहिती दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. अर्जातील तपशील दुरुस्त करण्यासाठीची विंडो गुरुवारी दुपारी १२ पासून सुरू झाली असून १४ मार्च रात्री ११.५० वाजेपर्यंत खुली राहणार आहे. या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जामधील काही निवडक तपशील दुरुस्त किंवा बदलता येणार आहेत.