Education Department Guidelines Teachers Banned
sakal
छत्रपती संभाजीनगर - काही शिक्षक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रील तयार करून सोशल मीडियावर अपलोड करतात. पण, आता त्यांना यासाठी पालक किंवा सक्षम प्राधिकरणांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा, मानसिक छळ, शाब्दिक अपमान किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई होणार आहे. हा निर्णय सर्व शाळांना बंधनकारक आहे.